मुंबई । महाराष्ट्रात कोरोना व्हायसरचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्याचा कोरोनाबाधितांचा आकडा हजाराच्या वर गेला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोरोना व्हायसरचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसंदर्भात फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यभरात फिव्हर क्लिनिक्स सुरु केली जाणार असल्याची घोषणा केली.
ज्याला कोणाला सर्दी, खोकला आणि ताप असल्यास इतर हॉस्पिटलमध्ये जाऊ नका, असं आवाहन देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं. यासाठी राज्यभरात फिव्हर क्लिनिक्स सुरु केली जाणार आहेत. राज्याच्या प्रत्येक विभागात ही क्लिनिक्स सुरु केली जाणार आहेत. त्यामुळे चार प्रकारामध्ये ही फिव्हर क्लिनिक्स सुरु केली जाणार आहेत त्यामध्ये डॉक्टर्स असतील असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. विलगीकरण, अलगीकर हे जसं आहे तसं हे वेगळीकरण आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
याचसोबत कोरोनाच्या संसर्ग आणखी फैलावू नये म्हणून सौम्य लक्षणं, लक्षणांची तीव्रता जास्त आणि खूप जास्त तीव्रता तसेच इतर आजार अशा प्रकारे आता हॉस्पिटलची विभागणी केली जाणार आहे. एकमेकांपासून एकमेकांना लागण होऊ नये यासाठी ही उपाययोजना केली जाणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”