हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली असून तब्बल 1 लाखांहून अधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील अनेक नेतेमंडळी देखील कोरोनाच्या विळख्यात आहेत. त्यातच मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा चिंताजनक आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात लॉकडाउन चा निर्णय घेणार की निर्बंध अजून कडक करणार याकडे जनतेचे लक्ष आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधल्यानंतर सविस्तर चर्चा करून राज्यात लॉकडाउन लावायचा की निर्बंध अजून कडक करायचे याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील अस समजत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील नाईट कर्फ्यु बाबत चर्चा सुरू असून अंतिम निर्णय हा मुख्यमंत्रीच घेतील अस म्हंटल होत.
राज्यात रात्रीच्या वेळी फिरणे, अतिरिक्त गर्दी करणे, धार्मिक स्थळे , चित्रपटगृह, मंदिरे यावर निर्बंध लागू होऊ शकतात. कोरोना रुग्णसंख्या अशीच दिवसेंदिवस वाढत गेली तर लॉकडाऊन केल्याशिवाय सरकारकडे पर्याय उपलब्ध नसेल.त्यामुळे राज्यात कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता वाढली आहे.