राज्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज मुख्यमंत्री करणार जनतेला संबोधित

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल आज मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. देशातील वाढत्या कोरोना संसर्गबाबत आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर संध्याकाळी देखील मुख्यमंत्री उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधून कोरोना संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

लॉक डाऊन की कडक निर्बंध?

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाउन ची तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाउन बाबत निर्णय होईल असं वारंवार सांगितलं जात होतं. पण सामान्य जनतेमधून आणि इतर घटकांमधून लॉक डाऊन ला तीव्र विरोध दर्शवण्यात येत आहे. हे पाहता आता राज्यात लॉक डाऊन होणार? की कडक निर्बंध लावले जाणार? याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे.

You might also like