कोरोनाशी लढताना मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ आरोग्य सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्रात कोरोना व्हायसरचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. निर्णय घेतला आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपली घरी बसून गैरसोय होतेय, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तणावमुक्त कसं राहता येईल याकडे लक्ष द्या. वाहिन्यांना विनंती की पॉझिटिव्ह कार्यक्रम अधिकाधिक दाखवा. तसंच नागरिकांनी घरात बसून व्यायाम करावा. व्यायाम केल्यास मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. हायरिस्क पेशंटनी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावं असं देखील आवाहन त्यांनी केलं.

सध्या करोनानं थैमान घातलं आहे. याचा आकडा वाढतोय. पण तो आपल्याला कमी करायचा आहे आणि आपण तो नक्की कमी करू. आपण करोनावर नक्कीच विजय मिळवू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच त्यांनी नागरिकांना घरात थांबण्याच्या सुचना केल्या. आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जनतेला व्यायाम करण्याचा सल्ला दिला. करोनाच्या युद्धानंतर आपल्याला अर्थव्यवस्थेचं युद्धही लढायचं आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दुकानात जाऊन मास्क विकत घेण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरीही कापडाचा मास्क तयार करा आणि तो वापरा. मास्क हे छत्रीसारखे वापरु नका. ज्याचा मास्क आहे तो त्यानेच वापरावा असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मास्क अत्यंत दक्षतेने वापरा. एकाचा मास्क दुसऱ्याने वापरु नका असंही त्यांनी जनतेला निक्षून सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment