छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना बाजीराव पेशव्यांसोबत; कुबेरांना नेमकं काय साध्य करायचं आहे?

0
72
Shivaji Maharaj
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव आज सातासमुद्रपार केला जातोय. मात्र त्या छत्रपतींची तुलना बाजीराव पेशव्यासोबत एका पुस्तकात करण्यात आली आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे आक्रमक झाले आहे. त्यांनी सदर पुस्तकातील तुलनात्मक केलेल्या उल्लेखाचा मजकूर ट्विट करून याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना बाजीराव पेशव्यांसोबत करून कुबेरांना नेमकं काय साध्य करायचं आहे? असा प्रश्न मिटकरी यांनी विचारला आहे. गिरीश कुबेर यांच्या पुस्तकातील पान क्रमांक 76 वरील उतारा आक्षेपार्ह वाटत आहे. पुस्तक पूर्ण वाचून यामध्ये जर छ. संभाजी महाराजांची बदनामी झाली असेल तर पावसाळी अधिवेशनात या पुस्तकावर बंदीची व कुबेरांवर कारवाईची मागणी करणार आहोत. तसेच पुस्तक वाचून पुढील भूमिका ठरवणार असल्याचे आमदार मिटकरी यांनी म्हंटले आहे.

आमदार मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, “छत्रपती शिवाजी महाराजांची बाजीराव पेशव्या सोबत तुलना करून कुबेराना नेमकं काय साध्य करायचं आहे? पुस्तकावर आक्षेप आले की प्रसिद्धी व खपाची विक्री वाढून अमाप पैसा हाच उद्देश लेखकांचा असेल तर हे गंभीर आहे.,” असे सांगत मिटकरी यांनी गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या या पुस्तकातील पान क्रमांक 76 वरील उतारा आक्षेपार्ह वाटत आहे. पुस्तक पूर्ण वाचून यामध्ये जर छ. संभाजी महाराजांची बदनामी झाली असेल तर पावसाळी अधिवेशनात या पुस्तकावर बंदीची व गिरीश कुबेरांवर कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती आमदार मिटकरी यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले.  अनेक लढाया लढून गड, किल्ले, प्रांत काबीज केले आहे. त्यांच्या विचारांवर आज करोडो लोक चालत आहेत. मराठा समाजबांधव प्रत्येक जाती, धर्मातील लोक छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा करीत आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनेक लेखकांनी लिखाण केला आहे. त्यातील एका लेखकाने आपल्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना थेट बाजीराव पेशव्यांशी केली आहे. या लेखकाच्या तुलनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी ट्विट करीत लेखकांनी आपल्या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी व खपासाठी, जास्त पैसे मिळवण्यासाठी अशा प्रकारचे लिखाण करून काय साध्य करायचे आहे? या लेखकांचा हा उद्देश गंभीर असल्याची टीका आमदार मिटकरी यांनी केली आहे.

या पुस्तकातील लेखाबाबत माहिती देताना आमदार मिटकरी यांनी म्हंटल आहे कि, एका प्रसिद्ध वृत्तपत्राचे लेखक गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या या पुस्तकातील पान क्रमांक 76 वरील उतारा आक्षेपार्ह वाटत आहे. पुस्तक पूर्ण वाचून यामध्ये जर छ. संभाजी महाराजांची बदनामी झाली असेल तर पावसाळी अधिवेशनात या पुस्तकावर बंदीची व गिरीश कुबेरांवर कारवाईची मागणी करणार आहे. तसेच संपूर्ण पुस्तक वाचून पुढील भूमिका ठरवणार आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या RENAISSANCE STATE पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण केले असल्याने कुबेर यांच्याशी फोनवर संपर्क केला असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्यांनी या पुस्तकातील आक्षेपार्ह लिखाण दुरुस्त करून सुधारित आवृत्ती प्रकाशित करावी. छत्रपती संभाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास चुकीच्या पद्धतीने समाजासमोर येता कामा नये ही विनंती, असे आमदार मिटकरी यांनी ट्विट्द्वारे म्हंटल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here