कॉ.पानसरे यांच्या हत्येला ५ वर्षे पूर्ण; कोल्हापूरात चळवळीतील कार्यकर्त्यांनी काढला निर्भय मॉर्निंग वॉक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरही तपासात गती नसल्याने आज कोल्हापूरमध्ये डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉक काढला. यामध्ये सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यासह मेघा पानसरे, उमा पानसरे, ज्येष्ठ विचारवंत यामध्ये सहभागी झाले होते. पानसरे यांच्या निवासस्थानापासून हा मॉर्निंग वॉक काढण्यात आला.

गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास कर्नाटक एसआयटीने गतीने केला. त्यांच्या तपासामुळे दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्येतील काही महत्त्वाचे धागेदोरे हाती आले. तसा तपास महाराष्ट्र एसआयटीने करावा. तपास यंत्रणांनी अधिक गतीने तपास करून विवेकवाद यांची हत्या करण्याचा विचार मांडणाऱ्यांच्या मुळाशी गेले पाहिजे परंतु या हत्येचा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला आहे. पण यामध्ये सुधारणा होण्याची गरज आहे.

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला पाच वर्षे झाली तरी पोलीस या खुनाचा तपास करत आहेत. तरीही त्यांना मुख्य सूत्रधार असणारे मारेकरी सापडत नाहीत ही निषेधाची बाब आहे, असं मेघा पानसरे यांनी म्हटलं आहे. तर जोवर न्याय मिळत नाही तोवर लढत राहायचं अस जेष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.