हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांची विविध पक्षातील नेते भेट घेत आहेत. आज काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पवारांची भेट घेतली आहे. पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासोबतच राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर देखील च्या भेटीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
निधी वाटपाविषयीची काँग्रेसची तक्रार जुनीच आहे. त्यातच पुढील विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. २०२४ साली राज्यात काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीतील पक्षांच्या अशा आक्रमक भूमिकेमुळे राज्यात वेगळा संदेश जात आहे.
https://twitter.com/bb_thorat/status/1401758655091904518?s=19
दरम्यान राज्यात मराठा आरक्षणाचा विषय देखील जोरदार चर्चेत असून छत्रपती संभाजीराजे यांनी 16 जूनला आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. त्यावर देखील चर्चा झाली असेल. तसेच सरकार मधील मंत्र्यांमधील अंतर्गत कुरघोडी देखील जगजाहीर होत आहेत. या पार्श्वभूमीवर थोरात यांनी घेतलेली पवारांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.