नाराज संजय निरुपम यांच्या खांद्यावर काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी ; थेट संसदीय मंडळावर केली नेमणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसचे नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी गेले काही दिवस थेट काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत. बऱ्याच बाबींवर नाराजी व्यक्त केली होती.पण काँग्रेसने त्यांना पुन्हा एकदा संधी देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय. संजय निरुपम यांची थेट महाराष्ट्र काँग्रेस संसदीय मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के. सी. वेणूगोपाल यांच्या स्वाक्षरीनं या संदर्भातील एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यानुसार, पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत व संसदीय मंडळावर आणखी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यामध्ये संजय निरुपम यांच्यासह माजी खासदार एकनाथ गायकवाड व माजी आमदार जनार्दन चांदुरकर यांची संसदीय बोर्डावर नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हे तिघेही मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत.

याशिवाय, कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून आणखी चौघांना स्थान देण्यात आलं आहे. त्यात नाना गावडे, सचिन नाईक, संजय राठोड व चारुलता टोकस यांचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment