तरी चीनकडून मोदींचं कौतुक का? राहुल गांधींचा संतप्त सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाखमध्ये चीननं घोसखोरीचं केली नसल्याच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर निशाणा साधणाऱ्या विरोधी पक्षांचा तिखट सूर मावळत नाही, तोच गांधी यांनी आणखी एक मुद्दा अधोरेखित करत सोशल मीडियावर एक प्रश्न उपस्थित केला आहे.

चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका वृत्ताचा संदर्भ देत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. ‘चीननं आपल्या जवानांना मारलं, चीननं आपल्या हद्दीतील भूखंडाचा ताबा घेतला, मग आता चीन या साऱ्या वादामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक का करत आहे’, असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला आहे.

‘ग्लोबल टाईम्स’च्या या वृत्तामध्ये काही तज्ज्ञांच्या मतांचा हवाला देत मोदींच्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला होता. १५- १६ जूनच्या रात्री लडाखमधील गलवान खोऱ्याच चीन-भारतमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर काँग्रेस, राहुल गांधींकडून मोदींवर टीकेचा भडीमार करण्यात सुरुवात करण्यात आली. त्यातच, ‘चीनकडून कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली नाही आणि आपल्या कोणत्याही चौकीवर त्यांचा ताबा नाही’, या वक्तव्य केलं होत. द मोदींच्या याच भूमिकेवर आता प्रश्नचिन्हं उपस्थित करणाऱ्या राहुल गांधी यांच्या प्रश्नाचं उत्तर नेमकं कोणाकडून दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment