कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
केंद्रीय तपास यंत्रणेकडून सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे ड्रग्ज प्रकरणही चांगलेच गाजत आहे. यावरून काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 20 हजार कोटींची हेरॉईन मुंद्रा बंदरावर आले. त्या प्रकरणाला कोणी दडपलं? कोणी एवढी मोठी कंसायमेन्ट पाठवली होती. कोणाच्या नावावर पाठवली होती. हि चौकशी दडपायचे काम चालले आहे का? म्हणून हे प्रकरण बाहेर काढले जात आहे का? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डग्ज, अंमली पदार्थांची तस्करी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे प्रकरण यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, 20 हजार कोटींची हेरॉईन मुंदडा बंदरावर आले. त्या प्रकरणाला कोणी दडपलं? कुणी एवढी मोठी कंसायमेन्ट पाठवली होती. कोणाच्या नावावर पाठवली होती.हे सर्व प्रकरण दडपण्यासाठी ड्रग्जचे प्रकरण काढले आहे का? हे प्रकरण बाहेर काढून मूळ प्रकरणापासून लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे का? या सर्व प्रकरणाची माहिती समोर आली पाहिजे. आणि गुन्हा घडला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे.
एनसीबी ही यंत्रणा संपूर्णपणे केंद्र सरकारची आहे. त्या यंत्रणेने चांगले काम करावे आणि दोषीना शिक्षा करावी, हि मागणी आहे. वानखेडे प्रकरणात केंद्र सरकारने खरी माहिती द्यावी. मोदी सरकार काय करत आहे? वानखेडे प्रकरणात केंद्र सरकारने काहीतरी खरे सांगितले पाहिजे. मात्र, केंद्र सरकार काहीच करत नसल्याचे दिसते. एनसीबीकडे असणारी माहिती लीक होतेय. याचे कारण म्हणजे एनसीबीची माहिती कोणीतरी कोण लिक करतय? ती प्रसारमाध्यमाकडे कोण पुरवतय. सर्वस्वी जबाबदारी हि केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्र सरकारचा यामध्ये काही हात नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.