हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईत आजपासून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. राणेंनी यात्रेच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडी सरकारबरोबर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राणेँच्य टीकेनंतर काँग्रेसकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “राणे सरकारचे दिवस भरले आहेत. त्यांना आशिर्वाद मागण्याचा अधिकार नाही,” असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन-आशिर्वाद यात्रेला सकाळी साडे अकरा वाजता सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखविला. राणेंच्या या जन आशीर्वाद यात्रेबद्दल टीका करताना थोरात म्हणाले की, भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. जनतेला प्रश्न पडेल यांना कशाला आशीर्वाद हवा आहे? अनेक नैसर्गिक संकटामध्ये सरकारने जे काम केले आहे त्याचे कौतुक सगळीकडे सुरु आहे. यूपी मध्ये काय झाले? मंत्री राणेंना आशीर्वाद मागण्याचा अधिकार देशात नाही तसेच राज्यातही नाही. त्यामुळे त्यांनी जन आशिर्वाद यात्रा काढू नये.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेबद्दल थोरात म्हणाले की, आमचा डीएनए विरोधी पक्षाचा आहे, त्यामुळे विरोधी पक्षाचे ते काम करत आहेत. हे सरकार आज जाईल उद्या जाईल हे दिवा स्वप्न बघत आहेत, आता दोन वर्षे पूर्ण होतील, पुन्हा होणाऱ्या निवडणूक एकत्र लढू आणि हे सरकार परत येईल. सरकार काम करत आहे, सरकारवर टीका करायला सोय नाही म्हणून मुख्यमंत्र्यांवर टीका केली जातेय, असे थोरात म्हणाले.