विजयसिंह मोहिते पाटील काँग्रेस आघाडीला आणखी एक धक्का देणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकलूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्थापनेपासून राहीलीले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये आणण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. आज इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

त्यांच्यामध्ये १ तास बंद खोलीत चर्चा झाली. त्यानंतर हर्षवर्धन पाटील आपल्या गावी म्हणजे बावड्याला रवाना झाले.
हर्षवर्धन पाटील यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कडून केला जात आहे. त्याच प्रमाणे त्यांना इंदापूरची जागा तुम्हाला सोडतो. सुप्रिया सुळेंचा प्रचार लोकसभेला करा असा देखील शब्द शरद पवार यांनी दिला होता. मात्र तो शब्द त्यांनी पाळला नाही. उलट इंदापूरची जागा राष्ट्रवादीचं लढणार असा निर्धार देखील त्यांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे कासावीस झालेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या समोर भाजप प्रवेशाशिवाय पर्यायच उरला नाही. म्हणून त्यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा देखील बोलावलं आहे. त्या मेळाव्यात ते भाजप प्रवेशाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

hellomaharashtra.in (27).jpg

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान देखील हर्षवर्धन पाटील यांना विजयसिंह मोहिते पाटील भेटले होते. तेव्हा यांच्यात सुप्रिया सुळे यांचा पराभव घडवून आणण्याच्या चर्चा झाल्या होत्या अशा बातम्या देखील माध्यमात आल्या होत्या. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या ताब्यात असणाऱ्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे सभासद इंदापूर तालुक्यात देखील आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील २२ गावात विजयसिंह मोहिते पाटील यांचा शब्द मानून मतदान केले जाते. त्यामुळे येत्या निवडणुकीला विजयसिंहांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा या भावनेने हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची भेट घेतली असावी.