हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्या संदर्भात वक्तव्ये केली. त्यानंतर तिच्यावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठली. कंगनाने केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. “भीख से अवार्ड मिल सकता है आझादी नही’, असे म्हणत कंगना राणावतला टोला लगावला आहे.
काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी आज पुणे येथे आज एका कार्यक्रमास भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशाला स्वातंत्र्याचे लोकांनी दिलेल्या बलिदानातून त्यांनी केलेलया संघर्षातून मिळत असते. भीक म्हणून पुरस्कार मिळू शकेल. मात्र भीक म्हणून स्वातंत्र्य मिळणार नाही.
कंगना राणावत हिने जी विधाने केलेली आहेत. याबद्दल सांगायचे झाले तर अशा प्रकारची विधाने ही मूळ मुद्द्याकडून देशाचे लक्ष भरकटवण्यासाठी केली जातात. त्यामुळे याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे गरजेचे आहे. यावेळी कन्हैय्या कुमार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावार भाष्य करताना त्यांनी देशात वन मँन शो चल रहा है. मात्र, शेतकरी आंदोलनाच्या पुढे ही ५६ इंच छाती घाबरली. घाबरूनच कृषी कायदे मागे घेतले. शेतकऱ्यांना हे सरकार घाबरले. त्यानंतर महाराष्ट्रात उद्वव सरकार, पश्चिम बंगालमध्ये दीदी सरकार, नीतीन सरकार हा पँटर्न खतरनाक आहेत, असे कुमार यांनी म्हंटले आहे.