काँग्रेस पक्षाची पडझड रोखण्याची आशा दिसत नाही”; माजी मुख्यमंत्र्याचे थेट सोनिया गांधींना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये पक्षबळकटी करणावरून नाराजीचे सूर व्यक्त केले जात आहेत. पक्षात अनेक वर्ष काम करून देखील पक्षश्रेष्टींकडून कामाची दखल घेतली जात नसल्याने नाराज असलेल्या काँग्रेस पक्षातील गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांनी सोमवारी राज्य विधानसभा सदस्यत्वाचा आणि काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून नाराजी व सध्याची परिस्थिती बाबत माहिती दिली. यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे कोणतेही भविष्य दिसत नसून गोव्यात पक्षाची परस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांनी आपल्या काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या सदस्यत्वाचा राजीनाना दिल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांशी बोलताना मनातील खंत व्यक्त केली. “मी काँग्रेसमध्ये त्रस्त होतो. मला गोव्याचा हा त्रास संपवायचा आहे. जर माझं दुःख इतकं असेल काँग्रेससाठी मतदान करणाऱ्या गोव्यातील नागरिकांच्या दुर्दशेची कल्पना करावी,” असे फालेरो यांनी म्हंटले आहे.

आगामी येणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी फालेरो यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देणे आणि गोवा निवडणुकीत तृणमूलने प्रवेश करण्याचा निर्णय घेणे हे काँग्रेससाठी धोक्याचे मानले जात आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या दोन पानांच्या पत्रात फालेरो यांनी काँग्रेससोबतच्या ४० वर्षाच्या प्रवासाबाबत आठवणीना उजाळा दिला आहे. त्यांनी पक्षासाठी केलेल्या कामाचाही उल्लेख केला. साडेचार वर्षांत मी पक्षाला एकत्र आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी हायकमांडने दुर्लक्ष केल्याची नाराजीही यावेळी फालेरो यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.