हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेस कडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे भाजप काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे घेणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
महाराष्ट्राची परंपरा राहिलीय की निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपनं अर्ज मागे घ्यावा ही विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्या विनंतीचा मान ठेवला जाईल,असे नाना पटोले यांनी म्हंटल.
काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून रजनी पाटील ह्या सध्या जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेस प्रभारी आहेत. त्या आधीही राज्यसभेवर होत्या. त्यानंतर आता त्यांना पुन्हा संधी देण्यात आलीय. दर भाजप कडून संजय उपाध्याय यांनी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरले. ही निवडणूक ४ ऑक्टोबरला होणार आहे.