खडसेंना डावलण्याचा प्लॅन दिल्लीत शिजला; राज्यातील भाजप नेतृत्वात ती ताकदच नाही- पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने एकनाथ खडसे यांनी संतापून राज्यातील भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. त्यावरून खडसे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये बराच कलगीतुराही रंगला आहे. दरम्यान आज भाजप-खडसे वादावर माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण एक गौप्यस्फोट केला आहे. ”आपल्या नेतृत्वाला अडचण होईल म्हणून खडसे नसलेले बरे, हा प्लान दिल्लीत झाला आहे. राज्यातील भाजप नेतृत्वात ही ताकद नाही. भाजपच्या दिल्ली नेतृत्वाचा वरदहस्त असल्याशिवाय असे होणे शक्य नाही,’”अशी टिप्पणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ऑनलाइन वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांची प्रशंसा केली. राज्यात भाजप शून्यातून उभा करण्याचे काम एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या लोकनेत्यांनी केले आहे. असा नेता काँग्रेसमध्ये आला तर त्याचा पक्षासाठी फायदा होईल असंही  त्यांनी म्हटलं. भाजपने त्यांना सन्मानाची वागणूक दिली नाही. प्रभावी नेता, पर्यायी नेतृत्व म्हणूनच त्यांना लक्ष्य करण्यात आले. पाच वर्षे मंत्रीपदासाठी झुलवत ठेवण्यात आले. प्रभावी लोकनेता आणि पर्यायी नेतृत्व असल्यानेच खडसेंना लक्ष्य करण्यात आले असून, भाजपच्या दिल्ली नेतृत्वाचा वरदहस्त असल्याशिवाय महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वामध्ये असे करण्याची ताकद नाही,’ अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपमधील अंतर्गत वादावर खोचक टिप्पणी केली. मात्र, खडसे यांना काँग्रेसने विधान परिषदेच्या सहाव्या जागेची, तसेच पक्ष प्रवेशाची ऑफर दिली होती का, याबाबत अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”