….तर नरेंद्र मोदी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील ; राहुल गांधींचं मोठं वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांचं गेल्या 29 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अजूनही सरकारला त्यात यश आलेलं नाही. सरकार तीन कृषी कायद्यांवर ठाम आहे तर शेतकरी देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रामनाथ कोविंद यांची भेट घेतली

कृषी कायद्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार हल्ला चढवला आहे. “जो विरोधात उभं राहतं त्याच्याविरोधात मोदी काही ना काहीतरी चुकीचं बोलत असतात. शेतकरी उभे राहिले तर शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणतील. मजूर उभे राहिले तर त्यांना दहशतवादी म्हणतील. एखाद्या दिवशी मोहन भागवत उभे राहिले तर त्यांनाही दहशतवादी म्हणतील. थोडक्यात जो कोणी मोदींकडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करणार त्याला दहशतवादी ठरवलं जाणार,” असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.

राहुल गांधींसोबत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींनी नवे कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचं सांगितलं. “करोनामुळे नुकसान होणार सांगितलं होतं पण कोणी ऐकलं नाही. आज मी पुन्हा सांगतोय की शेतकरी, मजुरासमोर कोणतीही शक्ती उभी राहू शकत नाही. जर पंतप्रधांनी कायदा कायदा मागे घेतला नाही तर फक्त भाजपा, आरएसएस नाही तर देशाचं नुकसान होणार आहे,” असा इशारा राहुल गांधी यांनी यावेळी दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment