हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
यावरुन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपची जी आलिशान कार्यालये आहेत, त्यामध्ये ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांनी कार्यालये शिफ्ट करावीत. त्यांनी अधिकृतपणे त्याबाबत घोषणा करावी. ईडी भाजपच्या विरोधकांसाठी काम करत आहे. भाजपचे विरोधक आहेत म्हणून जुने प्रकरण उगाळून काढून केवळ त्रास दिला जात आहे. जनतेलाही हे समजलं आहे. ईडीने आता नाटकबाजी करण्यापेक्षा भाजपच्या विरोधकांसाठी आम्ही करत आहोत ते अधिकृतपणे सांगावं” अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली.
फडणवीसांचा राऊतांना टोला
दरम्यान, कुणी चांगलं काम केलं तर त्यांना नोटीस मिळत नाही आणि चूक नसेल तर कुणी घाबरण्याचे कारण नाही”, असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. तसेच मी काही ईडीचा प्रवक्ता नाही त्यामुळं जे काही विचारायच ते ईडीलाच विचारा अस म्हणून त्यांनी यावर अधिक भाष्य करणं टाळलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’