नवी दिल्ली | सोशल मिडीयावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. तो व्हिडीओमाजी मंत्री आणि कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या आहे. MBIFL 19 या फेस्टिवलमध्ये व्यख्यान देण्यासाठी आलेल्या शशी थरूर यांना एका मुलाने विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत असतानाचा हा व्हायरल व्हिडीओ आहे.
इंग्रज जर व्यापारी आणि राज्यकर्ते म्हणून भारतात आले नसते तर काय झाले असते असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला असता त्यावर शशी थरूर म्हणाले कि , व्यापारी आणि राज्यकर्ते इंग्रज म्हणून भारतात आले नसते तर देशात मराठ्यांचे राज्य असले असते. यानंतर शशी थरूर यांनी संभाराचे उदाहरण दिले. संभाजी महाराजांना खाण्यासाठी विशिष्ठ पध्द्तीने तुरीच्या डाळीची पातळ भाजी बनवण्यात आली. ती संभाजी महाराजांना खूप आवडली म्हणून त्या भाजीला सांभर असे संबोधण्यात आले. या भाजीला नाव संभाजी महाराजांच्या नावाने सांभर असे नाव मिळाले हि मराठ्यांची दक्षिणेला मिळालेली देणं आहे असे शशी थरूर म्हणाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शौर्याच्या सहाय्याने देशभर आपला दबदबा निर्माण केला होता. त्यांच्यानंतर पेशवांच्या देखील अटकेपार झेंडे लावले. त्यामुळे इंग्रज आले नसते तर या देशावर मराठ्यांचे राज्य असले असते असे शशी थरूर म्हणाले आहेत.