हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूर लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये कुरघोडी पहायला मिळत आहे. सोलापूर मध्ये काँग्रेसचा सातत्याने पराभव होत असून हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीला सोडावा असं विधान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केल्यानंतर कोण रोहित पवार? असा सवाल करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांना फटकारले आहे.
सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आ. रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, “कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल” अशा शब्दात प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांना उत्तर दिले.
कोण रोहित पवार? मला माहिती नाहीत; प्रणिती शिंदेंचा पवारांवर निशाणा pic.twitter.com/RGbQBPGR0n
— santosh gurav (@santosh29590931) February 10, 2023
रोहित पवार काय म्हणाले?
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा वारंवार पराभव होत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीला सोडावा. राष्ट्रवादी हा मतदारसंघ लढवू शकतो. सोलापूर लोकसभा मतदारसंघ कोणी लढवयाचा, या संदर्भात महाविकास आघाडीची बैठक येत्या महिना, दोन महिन्यात होईल, असा माझा अंदाज आहे. सोलापूरची जागा काँग्रेसकडेच राहिलं की राष्ट्रवादीने लढवायची, हे देखील त्याच बैठकीत ठरेल, असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते.