हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आलेला आहे. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आहे. याबाबत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. “भाजप सरकार देशातील लोकांचा अंत पाहत आहे. आजचा हा बंद हा भाजप आणि मोदी सरकारच्या मग्रुरीविरोधात पुकारण्यात आलेला आहे. या बंदमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत,” असे शिंदे यांनी म्हंटले.
लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला सोलापूरकरांनीही मोठ्या प्रमाणात पाठींबा दिला आहे. यावेळी सोलापूच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या कि, भाजप आणि मोदी सरकारला हमारा कोई बिघाड नही सकता अअसे वाटत आहे. ज्या मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले, त्या मंत्र्याने दुसरीकडे उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले, इतके सरकार निगरगट्ट झाले आहे.
अशा याप्रकारे शेतकर्याना जीव घेऊनही कार्यक्रम घेत आम्ही काय काय करू शकतो हे सरकारकडून दाखवण्याचा प्रयत्न आहे. आम्ही मोदी सरकारच्या मग्रूर पणाच्या विरोधात बंद पुकारला आहे. केंद्र सरकारच्याविरोधात निषेध म्हणून सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौन आंदोलन करण्यात येत असल्याचेही काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हंटले आहे.