हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | युपीए अध्यक्षपदावरून राज्यातील महाविकास आघाडी मधेच बिघाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावे अशी जोरदार मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.
नाना पटोले म्हणाले , मुळात शिवसेना यूपीएचा भागच नाही. मग त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले होते संजय राऊत
यूपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ यूपीएचे अध्यक्षपद भुषविले आहे. मात्र, सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसते. देशात वेगळ्याप्रकराच्या घडामोडी घडत आहेत. अशावेळी यूपीएचे नेतृत्त्व शरद पवार यांनी करावं असं संजय राऊत म्हणाले होते. अनेक पक्षांना शरद पवार यांचे नेतृत्त्व मान्य होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा