साताऱ्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून वाढत्या महागाईचा आंदोलनाद्वारे निषेध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

वाढत्या महागाईचा विरोधात आज साताऱ्यात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजपचे सरकार सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेची लूट करत आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होताच पुन्हा दरवाढ करून जनतेस लुटण्यास सुरुवात केली आहे.याचा निषेध काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.

यावेळी पदाधिकाऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकारी शेखर सिह यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेची लूट करत आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीवेळी पराभवाच्या चितेने पेट्रोल, डिझेल, LPG गॅस सिलेडरच्या किमती सरकारने रोखून धरल्या होत्या. परंतु निवडणूक होताच पुन्हा दरवाढ करून जनतेस तुटण्यास सुरुवात केली आहे.

मागील 10 दिवसात पेट्रोल, डिझेलमध्ये दररोज 80 पेशाने वाढवत 8 रुपयाहून अधिक वाढ केली तर LPG गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग केला असून तो आता काही ठिकाणी 1000 रुपयांच्या वर गेला आहे. या सोबतच CNG आणि PNG गॅसही महाग केला आहे. खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे.

इंधन दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. जनतची खुलेआम लूट सुरू आहे पण केंद्रातील सरकार मात्र डोळे झाकून बसले आहे. जनतेला लुटणा-या सर्वसामान्यांच्या मेहनतीच्या कमाईवर डाका टाकणा-या केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात आवाज उठवून सरकारला जागे करण्यासाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाईमुक्त भारत अभियानांतर्गत तीन टप्यात रस्त्यावर उतरून केंद्र सरकरविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य
जनतेला या महागाईमुळे जगणे अवघड झाले आहे. महागाई विरोधातील सातारा जिल्हा काँग्रेस व जिल्ह्यातील जनतेच्या भावना केंद्र सरकारकडे आपल्या मार्फत पोहाचाव्यात, अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांनी केली.

Leave a Comment