सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
देशभरात पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्य जनतेच कंबरडे मोडले आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकार वर सडकून टीका केली आहे. मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे पेट्रोल डिझेलच्या एवढ्या किमती वाढल्या आहेत असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
मोदी सरकारने पेट्रोल डिझेल वर भरमसाठ कर वाढविल्यानेच हे दर वाढले असुन पाकिस्तान मध्ये 51 रुपयात पेट्रोल मिळत तर श्रीलंकेत 70 ते 80 रुपयात पेट्रोल मिळत असताना भारताचे दर 100 रुपयावर गेले याचे कारण मोदी सरकारचे आडमुठे धोरण” असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.संपूर्ण सरकारची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या भोकांडी हा पेट्रोल डिझेलचा कर बसवलं आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल आहे.
दरम्यान, राज्यातील ठाकरे सरकार मधील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील पेट्रोल डिझेल दरवाढ केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असुन केंद्र सरकारने याबाबत लवकर निर्णय घेऊन दरवाढ कमी करावी अशी मागणी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’