हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने केंद्रातील तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकर्यांना त्यांच्या “ऐतिहासिक विजयाबद्दल” त्यांचे अभिनंदन करणारे एक खुले पत्र लिहिले आहे. असत्यावर सत्याने मिळवलेला हा विजय असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.
राहुल गांधी म्हणाले, गोठवणारी थंडी, कडाक्याची उष्णता, पाऊस आणि गेल्या जवळपास वर्षभरात सर्व संकटे आणि अत्याचार असूनही शेतकऱ्यांनी जिंकलेला सत्याग्रह स्वतंत्र भारताच्या इतिहासात अतुलनीय आहे. “या लढ्यात 700 हून अधिक शेतकरी आणि मजुरांनी दिलेल्या बलिदानाला मी नमन करतो,
ज्या गांधीवादी पद्धतीने शेतकरी “निरंधर शासकाच्या अहंकाराविरुद्ध लढले आणि त्याला निर्णय मागे घेण्यास भाग पाडले ते असत्यावर सत्याच्या विजयाचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या प्राणांची आहुती देऊन या “सत्याग्रहाला” बळ देणार्या शेतकरी आणि मजुरांचे स्मरण करण्याचा हा ऐतिहासिक दिवस आहे.शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्राने सुरुवातीपासूनच लक्ष दिले असते तर असे झाले नसते, असे मला वाटते.”
राहुल गांधी यांनी म्हटले की, शेतकऱ्यांना आपला नफा-तोटा चांगल्याप्रकारे समजतो. काही मूठभर भांडवलदारांच्या हातातले बाहुले बनून शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतीत गुलाम करण्याचा कट रचण्याचा पुन्हा प्रयत्न करू नये असा इशाराही राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना दिला.
लुटमार, हट्टीपणा आणि अहंकाराला कोणत्याही लोकशाहीत स्थान नाही,” असे म्हणत मी तुम्हा सर्वांना आश्वस्त करतो की, सध्याच्या आंदोलनाप्रमाणे, तुमच्या भविष्यातील संघर्षात मी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यासह तुमच्या खांद्याला खांदा लावून आवाज उठवीन,” असेही राहुल गांधी यांनी म्हंटल.