हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ईडीची दहशत आहे. लोकशाही संपत चालली असून देशातील सर्व यंत्रणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात आहेत असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. दिल्ली येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसने 75 वर्षात जे कमावलं ते भाजपने आठ वर्षांत गमावलं. भारतात लोकशाही संपली आहे. देशात जर कुणी विरोधकांना पाठिंबा देत असेल किंवा सरकार विरोधात कोणीही बोलला की त्याच्या मागे ईडी आणि सीबीआय सारख्या तपास यंत्रणा लावल्या जातात. त्या व्यक्तीला तुरुंगात टाकलं जात अस म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकार वर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी त्यांनी वाढत्या महागाई वर ही बोट ठेवले. देशात महागाई वाढत आहे. बेरोजगारी वाढत आहे. मोदी सरकार स्टार्टअप इंडियाबद्दल बोलते, पण कुठे आहे स्टार्टअप इंडिया?? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. आज देशात महागाईचा उच्चांक झाला आहे. पण वाढत्या महागाईचे आकडे केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिसत नाहीत.बेरोजगारी वाढली आहे. पण भारत सरकार हे मान्य करण्यास तयार नाही अशी बोचरीं टीका राहुल गांधी यांनी केली.