फडणवीस फार मोठे नेते, मी त्यांच्यापुढे छोटा आहे ,मात्र…; सचिन सावंत यांच चोख प्रत्युत्तर

sachin sawant and fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन हत्या आणि कॉल टॅपिंग मुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे सचिन सावंत यांची खिल्ली उडवली होती. दरम्यान सचिन सावंत यांनीही देवेंद्र फडणवीस यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

खरं तर सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांबाबत फडणवीस यांना विचारलं असता त्यांनीअक्षरशः सचिन सावंतांची खिल्ली उडवली. सचिन सावंतांना मी काय उत्तर देणार. त्यांना काही समजते तरी का? त्यांना उत्तर द्यायला आमचे राम कदम आहेत. ते रोज काहीही बोलत असतात. दररोज रोज काहीही बोलणाऱ्यांना मी थोडीच उत्तर देणार, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता.

त्यावर, सचिन सावंत यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलंय. आदरणीय फडणवीस साहेब फार मोठे नेते आहेत, मी त्यांच्यापुढे छोटा आहे. मात्र, माझी विश्वासार्हता ही फडणवीस यांच्यापेक्षा कांकणभर जास्त आहे, असे सावंत यांनी म्हटलंय.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group