भाजपनं मराठा आरक्षणविरोधी लढ्याला रसद पुरवून मराठा समाजाशी दगाबाजी केली; काँग्रेसचा गंभीर आरोप

sachin sawant and fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत असतानाच आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपनं मराठा आरक्षणविरोधी लढ्याला रसद पुरवून मराठा समाजाशी दगाबाजी केली आहे,’ असा खळबळजनक आरोप सचिन सावंत यांनी केला आहे . तसेच जनतेची दिशाभूल करण्यासाठी 5 जूनला भाजप पुरस्कृत आंदोलनामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार उडाला, तर त्याला सर्वस्वी सुपर स्प्रेडर भाजप जबाबदार असेल, असा इशाराही सचिन सावंत यांनी दिला

मराठा आरक्षणाला पाठिंबा हा भाजपाचा दिखावा आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेप्रमाणेच भाजपची मानसिकता आरक्षणविरोधी आहे. मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढाई लढणारी ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ ही संस्था व त्याचे पदाधिकारी भाजप व संघाशी संबंधित आहेत. भाजपनं मराठा आरक्षणविरोधी लढ्याला रसद पुरवून मराठा समाजाशी दगाबाजी केली आहे,’ असा खळबळजनक आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयात आरक्षणविरोधी लढाई लढणारे ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ या संघटनेचे थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कनेक्शन आहे. या संस्थेतील बहुसंख्य विश्वस्त हे आरएसएसशी संबंधित असून नागपूरचेच आहेत. भाजपच्या कार्यातही या लोकांचा पुढाकार असतो याचे पुरावे समोर आले आहेत. CAA कायद्याला पाठिंबा देण्यासाठी ही मंडळी भाजपच्या व्यासपीठावर होती,’ याकडंही सावंत यांनी लक्ष वेधलं आहे

‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ या संस्थेचे संस्थापक डॉ. अनुप मरार हे भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे पूर्व विदर्भातील समन्वयक आहेत. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनीच त्यांची समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. मुंबई हायकोर्टात आरक्षणाची लढाई सुरू असताना ही संस्था अस्तित्वात नव्हती. परंतु हायकोर्टात आरक्षणाच्या बाजूनं निकाल लागताच या संस्थेचं कामकाज सुरू झालं. ही संस्था प्रमुख्यानं मराठा आरक्षणाच्या विरोधातच कार्यरत आहे असं कागदपत्रावरून दिसतं असे सचिन सावंत यांनी म्हंटल.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.