फडणवीसांनी भाजपशासित राज्यांच्या खोट्या आकडेवारीकडे लक्ष द्यावे ; काँग्रेसचे प्रत्युत्तर

Devendra Fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कोरोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबविण्यात यावे अशा शब्दात सरकारला घेरलं . करोनाच्या या दुसर्‍या लाटेत मुंबईतील संसर्ग दर कमी व्हावा, यासाठी कमी चाचण्या करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने होतो आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या या आरोपांवर सचिन सावंत यांनी उत्तर दिलं आहे. ‘मुंबईची वाखाणणी सर्वोच्च न्यायालयाने केली याचा फडणवीसांना खरंतर आनंद वाटायला हवा होता. पण त्यांची पोटदुखी व्हावी ही अपेक्षा नव्हती,’ असा टोला सावंत यांनी लगावला आहे.

करोना व्यतिरिक्त मृत्यू करोना मृत्यूशी जोडले तरी हा दर ०.८ टक्के फारतर होईल. तो ही जगात कमी आहे. मुंबईचा आम्हाला अभिमान आहे. अस्लम शेख व वर्षा गायकवाडही महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर मेहनत घेत आहेत. भाजपने पोटदुखीचा इलाज करावा व भाजपशासित राज्यांच्या खोट्या आकडेवारीकडे लक्ष द्यावे,’ अशी खोचक टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

फडणवीस नक्की काय म्हणाले-

मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे. हे प्रकार तत्काळ थांबवण्यात यावेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.