इतर कोणी कुंभमेळा थांबवण्याचे आवाहन केले असते तर हिंदूद्रोही ठरवलं असत – संजय निरुपम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाची स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. अशातच हरिद्वार येथील महाकुंभ मेळ्याला लाखो साधुसंतांनी हजेरी लावली. त्यामुळे अनेक साधू हे कोरोना बाधित झाले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाकुंभचे दोन शाहीस्नान झालेले आहेत कोरोना परिस्थितीमुळे महाकुंभ प्रतीकात्मक साजरा करावा असं म्हटले आहे’.आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी टोला लगावला आहे.

बरे झाले कुंभमेळा समाप्त करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले. हेच जर दुसरे कुणी केले असते, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते. ४९ लाख लोकांनी कालपर्यंत स्नान केले आहे. कोलकातापर्यंत जाणारी गंगा कोरोना कुठपर्यंत घेऊन जाईल, माहिती नसल्याचे म्हणत कुंभमेळा तात्काळ समाप्त करायला हवा, असे आवाहन निरुपम यांनी स्वामी अवधेशानंद गिरी यांना केले आहे.

दरम्यान, हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभ मेळ्यात अनेक साधू-संतांना कोरोना संसर्ग झाला आहे. यात काही साधूंचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे कुंभमेळाव्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली होती.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment