दोन शाही स्नान झाले आता कुंभ मेळा प्रतिकात्मकच चालू राहू द्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : देशात कोरोनाची स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. अशातच हरिद्वार येथील महाकुंभ मेळ्याला लाखो साधुसंतांनी हजेरी लावली. मात्र या ठिकाणी स्नानासाठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे अनेक साधू हे कोरोना बाधित झाले. त्यानंतर काही आखाड्यांनी कुंभाच्या समाप्तीची घोषणा केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाकुंभचे दोन शाहीस्नान झालेले आहेत कोरोना परिस्थितीमुळे महाकुंभ प्रतीकात्मक साजरा करावा असं म्हटले आहे’.आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे की,’ आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरि जी यांच्यासोबत आज फोनवर बोलणं झालं. सर्व संतांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली सर्व संत प्रशासनाला प्रत्येक प्रकारचं सहकार्य करत आहेत यासाठी मी संतांचे आभार व्यक्त केले मी विनंती केली की दोन शाहीस्नान झाले आहेत आणि इथून पुढे कोरोनाचे संकट पाहता कुंभ प्रतीकात्मक ठेवले जावे. यामुळे या संकटाचा विरोधातील लढाई ला एक ताकद मिळेल.

साधूंचे म्हणाले आभार

सर्व संत, प्रशासनाला सर्व प्रकारचे सहकार्य देत आहेत. मी यासाठी संत जगाचे आभार मानतो. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधू-संतांचे आभार देखील मानले आहेत.

दरम्यान, कोरोनाची परिस्थिती पाहता निरंजन आखड्याने कुंभ समाप्तीची घोषणा केली होती. 17 एप्रिल रोजी कुंभमेळा समाप्त केला जाईल असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांच्या या निर्णयाला काही आखाड्यांनी प्रचंड विरोध दर्शवला. निरंजनी आखाडा ला अशा प्रकारची घोषणा करण्याचा अधिकारच नाही असं इतर आखाडा मधील साधूंनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment