वाचाळांवर काय बोलायचे?; नाना पटोलेंचा पडळकरांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज त्यांच्यावर हल्ला करण्याच्या रचलेल्या कटात जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील असल्याचा आरोप केला. पडळकरांच्या आरोपांना राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचाळपणे बोलणाऱ्यांवर काय बोलायचे? असा सवाल करीत पटोलेंनी पडळकरांना टोला लगावला आहे.

भाजप नेते पडळकरांकडून गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर त्यांच्या आरोपांवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यावर पडळकरांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी पटोले म्हणाले की, भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जे काही आरोप केले आहेत अशा वाचाळवक्तव्य करणाऱ्यांबद्दल काय बोलायचे. त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त नाही केली तर बरेच होईल, असे पटोले यांनी म्हणत पडळकरांना टोला लगावला.

पडळकर काय केले आरोप

भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज सकाळी एक व्हिडीओ ट्विट करीत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पडळकर यांनी एका व्हिडीओतून माझ्यावर हल्ला करण्यामध्ये जयंत पाटील यांचा सहभाग होता असा आरोप केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी तो व्हिडीओ 7 नोव्हेंबर रोजीचा असल्याचा दावा केला आहे. आटपाडी पोलीस स्टेशनच्या जवळून जात असताना माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. हा हल्ला सुनियोजित होता, माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूने 200 ते 300 लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

Leave a Comment