राष्ट्रपती राजवटीच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही; नाना पटोलेंचे भाजपला प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा अध्यक्ष निवडीवरून आज सत्ताधारी व विरोधकांच्यात चांगलेच वातावरण तापले होते. भाजप नेत्यांनी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शंका व्यक्त केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याचे पहायला मिळाले. अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत थेट भाजपला आव्हान दिले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी विरोधी पक्षाकडून दिली जात आहे. परंतु विरोधी पक्षांनी भ्रमात राहू नये. महाविकास आघाडी सरकार अशा धमक्यांना घाबरत नाही, असे प्रत्युत्तर पटोले यांनी यावेळी दिले.

काँग्रेस प[रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. यावेळी पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने राज्यपालांच्या माध्यमातून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळा आणला आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नियमाला धरून घेण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा होता. नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असे काहीच नाही. राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा. त्यांनी विनाकारण यावरून राजकारण करु नये.

राज्यात वाढलेल्या कोरोनामुळे आतापर्यंत झालेली अधिवेशने कमी कालावधीची झाली होती. त्यामुळे आतापर्यंत विधासभा अध्यक्षपदाची निवडणुक घेता आली नाही. आता निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न केला तर त्यामध्ये भाजपकडून अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेबाबत भाजपाची असलेली दुतोंडी भूमिका यामुळे उघडी पडली आहे, असे पटोले यांनी म्हंटले.

Leave a Comment