हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेना यांच्यात सध्या बिनसलेलं दिसत आहे. कारण नाना पटोले व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे पक्षाबद्दल ‘सामना’तून टीका केल्यानंतर पटोले यांनी आपल्या शैलीत इशारा दिला आहे. “मी ‘सामना’ वाचत नाही, गांधी परिवारावर टीका करण म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. जो थुंकेल त्याच्यावरच पडेल हे त्यांनी लक्षात ठेवावे,” अशा शब्दात पाटोलेंनी शिवसेनेला इशारा दिला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून दिल्लीत काँग्रेसनेते राहुल गांधी यांची आज भेट घेतली जाणार आहे. पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्यावर पक्षवाढीची व बळकटीची जबाबदारी आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र, आघामी निवडणुकीत पाटोलेंनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे आघाडी सरकारमधील इतर नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली गेली आहे.
दरम्यान , काँग्रेसवर शिवसेनेच्या सामनामधून टीका करण्यात आली आहे. त्याविषयी माध्यमांनी पटोले यांच्याकडे विचारणा केली असता पटोले म्हणाले की, मी सामना वाचत नाही. कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण वारंवार त्याच त्याच गोष्टी सोबत राहून बोललं जातं असेल तर त्याचा विचार आम्हालाही एकदा करावा लागेल”, असे पाटोलेंनी उत्तर दिले.
शिवसेनेने ‘सामना’तून गांधी कुटुंबियांबद्दल टीका केल्यानंतर याविषयी पटोलेंनीही शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी गांधी परिवारावर टीका करण म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. जो थुंकेल त्याच्यावरच पडेल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा यावेळी पटोले यांनी शिवसेनेला दिला आहे. आता पाटोलेंच्या या इशाऱ्याला खासदार राऊत कशा प्रकारे उत्तर देतात हे पहावे लागेल.