हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजप कडून नेहमीच हे सरकार पडणार अशा शक्यता पसरवल्या गेल्या. दरम्यान आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील आता काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढेल अस भाकीत केलं आहे. ते सातारा येथे बोलत होते.
आठवले म्हणाले, राज्यात काँग्रेस पक्ष हा महाविकासआघाडीवर नाराज असून हा पक्ष सत्तेतून लवकरच बाहेर पडेल आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष सत्तेवर येईल, असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच हे सरकार आणखी किती दिवस सत्तेवर राहील याबाबत आपल्या मनात शंका असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर देखील भाष्य केले. मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून, हत्या असल्याचा संशय आहे. मुकेश अंबानींचे घर उडविण्याचा हा कट असू शकतो. पोलीस अधिकारी वाझेंची वागणूक संशयास्पद असून, कोणालाही पाठीशी न घालता त्यांची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’