मुंबई । दिवसागणिक देश आणि राज्यात कोरोनाचं संकट वाढत आहे. कोरोनाचा फैलाव वाढत असल्यानं लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळं नियोजित एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनामुळं या परीक्षा कधी होणार यावर कोणीही काही सांगू शकत नाही आहे. त्यामुळं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. म्हणून उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी या स्पर्धा परीक्षांच्या निकषांमध्ये वयोमर्यादेत १ वर्ष वाढ करण्यात यावी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे. जर असा निर्णय झाला तर राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन हा ३ मे पर्यंत वाढला असल्याने या वर्षात या एमपीएससी ,यूपीएससी स्पर्धा परीक्षा नेमक्या कधी घ्यायच्या ? हा प्रश्न आहे. यामध्ये या वर्षभरात जर स्पर्धा परीक्षा घेता आल्या नाहीत तर या परीक्षेसाठी पात्र असलेले हजारो विद्यार्थी वयोमर्यादेबाहेर जातील व त्यांना परीक्षा पुन्हा देता येणार नाही. त्यामुळे वयोमर्यादेत असलेल्या विद्यार्थ्यांचा हे वर्ष वाया वाया जाऊ नये यासाठी विद्यार्थ्यांच्या हितासाठी या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत यावर्षीसाठी 1 वर्ष वाढवून देणं शक्य होईल का ? या निर्णयाबाबत विचार सुरू आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”