हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाजपवर नाव न घेता टीका केली आहे. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची कारस्थाने आजही पूर्णपणे संपलेली नाहीत. आधी मुंबईचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व कमी करायचे व एका बेसावध क्षणी मुंबई केंद्रशासित करायची. श्री. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या महाराष्ट्रातील भाजपास या सगळ्याची पूर्ण कल्पना आहे असे संजय राऊत यांनी म्हंटल.
इतक्या वर्षांनंतरही मुंबई कोणाची, असा प्रश्न विचारला जात आहे. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती मुंबईत राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती हिंदुस्थानची आहे. पण आधी ती महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची कारस्थाने आजही पूर्णपणे संपलेली नाहीत. आधी मुंबईचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व कमी करायचे व एका बेसावध क्षणी मुंबई केंद्रशासित करायची. श्री. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या महाराष्ट्रातील भाजपास या सगळ्याची पूर्ण कल्पना आहे. फडणवीस यांनी मुंबईत जे अमराठी पंचक निर्माण केले आहे. त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी कशी करता येईल याचे एक ‘प्रेझेंटेशन’ तयार करून गृह मंत्रालयास सादर केले. विक्रांत’ घोटाळ्यातील आरोपी व त्यांच्या अमराठी बिल्डर साथीदारांकडे त्या मोहिमेची सूत्रे आहेत. एका बाजूला आपण महाराष्ट्र दिन साजरा करायचा व त्याच वेळी महाराष्ट्राच्या भूगर्भात मुंबई तोडण्याबाबत हालचालींना वेग यावा, हे बरे नाही. असे संजय राऊत यांनी म्हंटल
श्री. शरद पवार हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवरील मोठे नेते. महाराष्ट्र घडविण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र घडविण्याबाबतचे योगदान वेगळ्या पद्धतीचे आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते एक व्यंगचित्रकार म्हणून फटकारे मारीत होते. पुढे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या हक्कांसाठी ते प्रत्यक्ष रणात उतरले. नंतर त्यांनी केलेली शिवसेनेची स्थापना व त्यातून उभा राहिलेला स्वाभिमानी महाराष्ट्र हे आदर्श कार्य आहे. मुंबईत शिवसेना नसती तर आज ती केंद्रशासित व्हायला वेळ लागला नसता. बाळासाहेब ठाकरे यांनी तोलामोलाचे राजकारण केले, पण ते मुख्यमंत्री वगैरे झाले नाहीत. त्यांनी अनेकांस त्या ‘पदावर’ बसवले व विकासात्मक कामे करून घेतली. शरद पवार अनेकदा मुख्यमंत्री व पेंद्रात मंत्री झाले. महाराष्ट्रातल्या औद्योगिक, सामाजिक जडणघडणीत त्यांनी काम केले. यशवंतरावांनी या कार्याची सुरुवात केली. शरद पवारांनी ते शिखरावर नेले. असे म्हणत संजय राऊत यांनी पवारांचे कौतुक केलं
मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून जागतिक स्तरावरचे नेते मुंबईत येत नाहीत. त्यांना आधी गुजरातला व मग दिल्लीत नेले जाते. श्री. शरद पवार यांनी हीच खंत आठवडाभरापूर्वी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी हे हिंदुस्थानात येणारया जागतिक नेत्यांना गुजरातमध्ये नेऊन स्वतच्या राज्याचा विकास करतात, असे श्री. पवारांसारखे नेते सांगतात तेव्हा ती बाब गांभीर्याने घेतलीच पाहिजे.
गुजरातशी भांडण असण्याचे कारण नाही, पण मुंबई महाराष्ट्राला कमीपणा दाखविण्यासाठी हे केले जाते. देशात इतरही राज्ये व शहरे आहेत. पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात, त्यात मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी हे ‘आर्थिक महत्त्व कमी करण्यासाठी मुंबईत होणारे – आंतरराष्ट्रीय वित्तीय पेद्र गुजरातमध्ये नेले गेले. उद्या मुंबईचे हात-पायही अशा प्रकारे छाटले जातील! असा गंभीर इशारा संजय राऊत यांनी दिला