हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसनेते ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आपली भूमिका ठाम ठेवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फक्त एकच बैठक घेतली पण विश्वासात घेतलं नाही असा थेट आरोप राऊत यांनी केला आहे. त्यामुळे कॅबिनेट बैठकी आधीच महाविकास आघाडी मध्ये वाद पेटलाय.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले आजच्या कॅबिनेट बैठकीत पदोन्नती आरक्षण जीआर बाबत आग्रही भूमिका मांडणार आहोत. हा जीआर रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. असं राऊत यांनी स्पष्ट केले आहे. कॉमन मिनिमम ठरलेला आहे. आरक्षण विषयावर भूमिका काय घ्यायची हा पक्षपातळीवरचा विषय आहे. आमच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र पाठवले आहे. पण महाविकासआघाडी समन्वय समितीने बैठक घेतली नाही असंही राऊत यांनी सांगितले.
अजित पवार यांनी फक्त एकच बैठक घेतली पण विश्वासात घेतले नाही. नवाब मलिक यांच्या माहितीसाठी अनेक दलित अधिकारी संघटना यांनी अध्यादेश रद्द करावा म्हणून अर्ज काँग्रेस पक्षाकडे केले. म्हणून आम्ही आग्रही भूमिका घेतली. अध्यादेश रद्द करावा ही ठाम भूमिका आहे असे यावेळी बोलताना राऊत यांनी स्पष्ट केले आहे.