भारतीयांच्या जीवापुढे अर्थव्यवस्थेचं नुकसान काहीच नाही- पंतप्रधान मोदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलंय. यावेळी बोलताना मोदींनी लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेला बसत असलेला फटका आणि सामान्यांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणींचा उल्लेखही केला. “आर्थिक स्तरावर मोठे नुकसान झालं आहे. त्याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. मात्र भारतीयांच्या जीवापुढे हे नुकसान काहीच नाही. मर्यादीत साधनांच्या आधारे भारताने ज्याप्रकारे वाटचाल केली आहे त्याची जगभरात चर्चा आहे,” असं यावेळेस मोदींनी सांगितलं.

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग बंद करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी लॉकडाउनच्या घोषणेनंतर कामगारांनी आपल्या राज्यात परत जाण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांच्या कमतरतेमुळे उत्पादनाला फटका बसला आहे. याचबरोबर अनेक क्षेत्रांनाही करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका बसला आहे. याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मोदींनी अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र त्याचवेळी भारतीयांच्या जीवापुढे हे नुकसान काहीच नसल्याचे सांगत त्यांनी लॉकडाउन गरजेचेच होते हे अधोरेखित केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment