कोरोनामुळे आशियातील १२ कोटी बालकं उपासमारीच्या खाईत; येत्या ५ वर्षांत ९ लाख मुलांच्या मृत्यूची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना संकटाच्या काळात अविकसित आणि विकसनशील देशांना मजबूत फटका बसण्याची चिन्हे आहेत. देशातील व्यापार-उद्योग डबघाईला आलेले असताना समाजाच्या खालच्या स्तरात असणारी लहान बालकं आणि त्यांना जन्म देणाऱ्या माता यांची परिस्थिती येत्या काळात बिकट होण्याची शक्यता युनिसेफने वर्तवली आहे.

कोरोना आल्यानंतर कडक लॉकडाऊनमुळे कष्टकरी वर्गाचे प्रचंड हाल झाले होते. आता त्याचीच परिणीती भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, मालदीव या दक्षिण आशियाई देशांमध्ये दिसून येणार असल्याची शक्यता युनिसेफने वर्तवली आहे. या देशांतील तब्बल १२ कोटी बालकांची उपासमार होणार असून त्यामूळे या देशांतील एकूण उपासमारग्रस्त बालकांचा आकडा ३६ कोटींपर्यंत जाईल असा अंदाज युनिसेफतर्फे व्यक्त केला जात आहे.

उपासमारीच्या एकूण संख्येपैकी तब्बल ९ लाख बालकांचा आणि ३६ हजार मातांचा मृत्यू येत्या ५ वर्षांत होऊ शकतो असा अंदाजही अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कुल ऑफ मेडिसिनने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. अंगणवाडीपर्यंतच्या बालकांना योग्य पोषण आहार मिळाल्यास कुपोषणाच्या आणि उपासमारीच्या समस्येवर आपण योग्य मार्ग काढू शकू असं मत युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी यास्मिन हक यांनी व्यक्त केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.