औरंगाबाद | होळी सण हा अत्यंत महत्वाचा सण म्हणून साजरा केला जातो. अनेकजण मोठ्या उत्साहात होळी सण सामूहिकरित्या साजरा करतात. मोठ्या प्रमाणावर शहरात रंगांची उधळण करत विविध गाण्यांवर तरुणाई थिरकताना देखील दिसते. परंतु त्यावर देखील आता मयार्दा आल्या आहेत. मागील वर्षी कोरोनाचे आगमन झाले आणि होळीवर कोरोनाचे सावट पसरले. तेच सावट यंदाही कायम असून रंग विक्रेते, पिचकाऱ्या विक्रेत्यांना आर्थिक फटका बसला आहे.
मागील वर्षी कोरोनाने सर्वत्र विळखा घातला होता. त्यामुळे धुलीवंदन अगदी साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले होते. यावर्षी कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते त्यामुळे सर्वच व्यवसाय पूर्वपदावर येत होते. मात्र आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे त्यामुळे चिंता तर वाढली आहेतच. मात्र याशिवाय कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन आणि शनिवारी आणि रविवारी पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे यंदा देखील होळी अगदी साध्या पद्धतीने साजरी होणार असल्याचे दिसून येत आहे. धुलीवंदनाच्या निमित्ताने दरवर्षी शहरातील ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. मात्र मागील वषीर्पासून कोरोनामुळे धुलीवंदनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यंदा देखील कोरोनाचे सावट असल्याने रंग, पिचकाऱ्या विक्रेत्यांनी रंग आणि पिचकाऱ्या बाहेरून विक्रीसाठी शहरात आणल्या नाहीत. मागील वषीर्चेच रंग, पिचकाºया विक्री झाल्या नाहीत. त्या या वर्षी तरी विक्री होतील अशी अपेक्षा रंग, पिचकाºया विक्रेत्यांना होती. परंतु यंदा देखील मागणी काहीच नसल्याने कोरोनाचे सावट यंदाही धुलीवंदनाच्या सणावर आले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान रंग, पिचकाºया विक्रेत्यांचे झाले असल्याची खंत रंग विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
मागणी नाहीच : रंग विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धुलीवंदनाच्या सणावर कोरोनाचे सावट पसरलेले आहे. मागील वर्षी देखील रंग विक्री झाला नाही तोच रंग किमान यंदा तरी विक्री होईल असे वाटले होते परंतु आता तर रुग्णांची संख्या प्रतिदिन हजारांहून अधिक वाढत असल्याने यावर्षी देखील धुलीवंदनाच्या सणावर सावट पसरले आहे. रंग आणि पिचकाऱ्याला मागणी नाही आहे. त्यामुळे आता पुन्हा पुढच्या वषीर्ची वाट पहावी लागणार असल्याची खंत देखील रंग विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group