Corona Impact | काठमांडूतून पहिल्यांदाच दिसला २०० किमी दूर असणारा एव्हरेस्ट पर्वत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिमालयातील सुंदर शिखरे पाहणे हा एक अतिशय आनंददायक अनुभव आहे. जगभरातील अनेक लोकं हिमालयातील ही मनोहारी शिखरं पाहायला जात असतात. मात्र असंख्य असे लोक देखील आहेत ज्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात हिमालयातील ही शिखरे पाहता येत नाहीत. सध्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे जगभरातील देशात लॉकडाऊन सुरु आहेत, ज्यामुळे वातावरणातील प्रदूषणाची पातळी खूपच कमी झाली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे विजिबिलिटीमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे आणि त्यामुळे शेकडो किलोमीटरपासून दूर असलेली हिमालयातील शिखरेही आता व्यवस्थित दिसू लागली आहे.

जालंधर, सहारनपूर येथूनही दिसली शिखरे
सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे तसेच व्यवसायही बंद आहेत, ज्यामुळे वातावरर्णांतील प्रदूषणाची पातळी खूपच कमी झाली आहे. प्रदूषण कमी झाल्यामुळे विजिबिलिटी खूपच वाढली आहे. जालंधरमधूनही हिमालयातील शिखरे पाहता येतील याची कोणाला कल्पनाही नव्हती, मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच ही शिखरे दिसू लागली. अगदी घराच्या छतावरुन, हिमालयातील धौलाधर पर्वत लोकांनी पाहिले. इतकेच नव्हे तर काही काळानंतर उत्तर प्रदेशातील सहारनपुरातून ही शिखरे दिसू लागली.

लोकांनी फोटो केले शेअर
पण आता काठमांडूतील लोकही पहिल्यांदाच अगदी त्यांच्या घरातूनच माउंट एव्हरेस्ट पाहत आहेत. लोकांनी त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काठमांडूहून पाहिले गेलेलय एव्हरेस्ट पीकची छायाचित्रे लोकांनी शेअर केली आहेत, महत्त्वाची बाब म्हणजे काठमांडूपासून माउंट एव्हरेस्ट हे २०० किलोमीटर दूरवर आहे. आभूषण गौतम क्लिक केलेली छायाचित्रे नेपाळ टाईम्सच्या ट्विटर हँडलवर शेअर केली गेली आहेत.

हवा स्वच्छ झाल्यावर दिसले माउंट एव्हरेस्ट
नेपाळ टाईम्सने ट्वीट करून असे म्हटले आहे की,’ कोविड -१९ मुळे देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे, त्यामुळे नेपाळ आणि उत्तर भारताची हवा अगदी साफ झाली आहे. अनेक वर्षांत पहिल्यांदाच २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या काठमांडूहून माउंट एव्हरेस्ट पाहिले जाऊ शकले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.