हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पती सदानंद सुळे यांचाही करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.
सुळे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून सुळे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. सुळे यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या”.
मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.
— Supriya Sule (@supriya_sule) December 29, 2021
दरम्यान त्यांनी नुकतीच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नात त्याचबरोबर निहार ठाकरे आणि अंकिता पाटील यांच्या लग्नातही उपस्थिती लावली होती. त्यामुळे त्या अनेकांच्या संपर्कात आल्या असल्याची शक्यता आहे.