VIP संस्कृती! लेकीला घरी आणण्यासाठी लॉकडाऊनमध्ये भाजप आमदाराचा कारने २ हजार किमीचा प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लॉकडाऊनमध्ये सर्व वाहतूक बंद असल्याचा फटका लाखो स्थलांतरित मजुरांना बसला. अनेक मजूर कल्पना येण्याच्या आत देशातील विविध शहरांमध्ये उपाशीपोटी राहण्यास मजबूर झाले. यांतील बहुसंख्य लाखो मजूर बिहार आणि उत्तरप्रदेश मधील आहेत. या मजुरांनी वारंवार विनवण्या करूनही दोन्ही राज्यांच्या सरकारांनी लॉकडाऊन आणि कोरोनासंसर्गाच्या धोक्यामुळं त्यांना घरी आणण्यास असमर्थता दर्शवली. दरम्यान, अशा सर्व परिस्थितीत बिहारमधील नितीश कुमार यांच्यासोबत सत्तेत असणाऱ्या भाजपाचा आमदार मात्र नुकताच राजस्थानमधील कोट्टा येथून स्वत:च्या मुलीला घेऊन बिहारमध्ये परतल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील बातमी ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उत्तरप्रदेश नुकतेच उत्तर प्रदेश सरकारने राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार चांगलेच संतापले असून करोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर अशा गोष्टींना परवानगी देण्यात येऊ नये असं मत त्यांनी नोंदवलं आहे. त्यामुळं नितीश कुमार यांची गत दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान प्रमाणे झाली आहे.

हिसुआ (नवा) येथील आमदार असणाऱे अनिल सिंघ यांना नावाडा जिल्हा प्रशासनाने विशेष पास उपलब्ध करुन दिला. त्यामुळेच सिंघ यांनी नावाडा ते कोटा असा दोन हजार २०० किमीहून अधिक प्रवास करत आपल्या मुलीला ते परत घेऊन आले. कोटा हे शहर मेडिकल तसेच इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या क्लासेससाठी लोकप्रिय आहे. या शहरामध्ये मेडिकल आणि इंजिनियरिंगच्या स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी देशातील वेगवेगळ्या भागांमधून विद्यार्थी कोट्टामध्ये येतात. आमदार सिंग यांची मुलगी कोटा येथे शिकत आहे.

दरम्यान, नवादा येथील उपविभागीय अधिकारी असणाऱ्या अनू कुमार यांना गाड्यांना विशेष पास देण्याचा अधिकार आहे. माझी मुलगी अ‍ॅलन इंन्स्टिट्यूट येथे मेडिकल प्रवेश परिक्षेची तयारी करत आहे. मात्र ती आजारी असल्याने तिला घरी आणण्यासाठी मला विशेष पास देण्यात यावा अशी मागणी आमदाराने केल्याची माहिती कुमार यांनी दिली. आमदाराला दिलेल्या पाससंदर्भात विचारणार केली असता कुमार यांनी “यासाठी आमदाराने जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. जेव्हा गरज असते तेव्हा आम्ही पासेस देतो. मात्र नावाडा येथून बाहेर जाणाऱ्या गाड्यांनाच आम्ही पास देऊ शकतो,” अशी माहिती दिली.

सिंघ यांच्या नावाने जारी करण्यात आलेल्या पासची मर्यादा दहा दिवसांची होती. १६ एप्रिल ते २६ एप्रिलच्या कालावधीसाठी हा पास देण्यात आला होता. मात्र पास मिळाल्यानंतर आमदार दोन दिवसातच मुलीला घेऊन परत आल्याचे सांगितले जात आहे. याबद्दल आमदार सिंघ यांच्याकडे विचारणा केली असता आपण काहीही चुकीचे केलेलं नाही असं मत व्यक्त केलं. आपल्या कृत्याने लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन झालेलं नाही असंही सिंघ यांनी सांगितलं आहे. “अती महत्वाच्या कामासाठी पासेस दिले जातात. दिलेल्या नियमांनुसार मी ई-पाससाठी अर्ज केला. माझ्या मुलीला परत आणणे माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. मला पास देण्यात आला. मी नियमांचे पालन करतच गेलो आणि परत आलो. यात माझं काय चुकलं? यावर राजकारण केलं जाऊ नये,” असं आमदाराने ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना म्हटलं आहे.

”कोटामधील अनेक विद्यार्थ्यांनी गटागटाने तेथील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि बसच्या पासेसची परवानगी मिळाल्यानंतर हे विद्यार्थी आपल्या राज्यांमध्ये निघून गेले. मात्र मला हे पटले नाही. बसमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळेच मी माझ्या स्वत:च्या गाडीने गेलो. मी अन्नपदार्थ आणि पाणी स्वत:बरोबर नेल होतं. त्यामुळे मला कुठेही थांबावं लागणार नाही याची मी काळजी घेतली होती,” असंही सिंघ म्हणाले.

राजकीय विश्लेषक असणाऱ्या प्रशांत किशोर यांनी या प्रकरणावरुन बिहार सरकारवर टिका केली आहे. “नितीश कुमार यांनी कोट्टामध्ये अडकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी नितीश कुमार यांच्याकडे बिहारमध्ये आणण्याची व्यवस्था करण्यासासंदर्भातील मागणी केली. तेव्हा त्यांनी असं करणं लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करण्यासारखं होईल असं सांगत ही मागणी फेटाळून लावली. मात्र आता त्यांच्याच सरकारने भाजपाच्या एका आमदाराला आपल्या मुलीला परत आणण्यासाठी विशेष परवानगी दिली. नीतीशजी आता यासंदर्भात तुम्ही काय सांगाल?,” असा टोला किशोर यांनी ट्विटवरुन लगावला आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर बिहारमध्ये विरोधात असलेल्या लालूप्रसाद यांचा पक्ष आरजेडीने व्हिआयपी संस्कृतीवर टीका केली आहे. आरजेडीचे नेते मृत्यूंजय तिवारी यांनी एखाद्या विषयाबद्दल सरकारने दोन वेगवेगळ्या भूमिका घेऊ नयेत असं मत व्यक्त केलं आहे. भाजपाचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी भाजपा आमदाराने सर्व नियमांचे पालन करुनच आपल्या मुलीला परत आणलं असल्याने यावरुन राजकारण केलं जाऊ नये असं मत व्यक्त केलं आहे. “ज्यांना गरज असते अशा सर्वांना विशेष पास हा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दिला जातो. इथे कोणालाही विशेष वागणूक देण्यात आलेले नाही. काहीजणांना सर्व गोष्टी चुकीच्या पद्धतीने समजून घेण्याची सवय असते,” असा टोला आनंद यांनी विरोधकांना लगावला आहे.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”