मुंबई। राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४ हजार ४८३ वर जाऊन पोहोचली आहे. ही सकाळी ११ वाजेपर्यंतची आकडेवारी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या आकडेवारीनुसार भिवंडी १,कल्याण डोंबिवली १६, मीरा भाईंदर ७, बृहन्मुंबई १८७, नागपूर १, नवी मुंबई ९, पनवेल ६, पिंपरी चिंचवड ९, रायगड २, सातारा १, सोलापूर १, ठाणे २१, वसई विरार २२ अशी २८३ नवीन रुग्णांची वाढ झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची 11:00 (AM) पर्यंतची संख्या 4483 यात भिवंडी 1,कल्याण डोंबिवली 16,मीरा भाईंदर 7,बृहन्मुंबई 187,नागपूर 1,नवी मुंबई 9,पनवेल 6,पिंपरी चिंचवड 9,रायगड 2,सातारा 1,सोलापूर 1,ठाणे 21,वसई विरार 22 अशी 283 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 20, 2020
तर दुसरीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील २४ तासांत करोनामुळे 36 जणांचा मृत्यू झाला. तर 1 हजार 553 नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील करोनाबाधितांचा एकूण आकडा 17 हजार 265 वर पोहचला आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 14 हजार 175 रुग्ण, रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेले 2 हजार 546 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 543 जणांचा समावेश आहे.
WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”.