पॅरिस । कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जवळजवळ सर्वच देश प्रभावी पावले उचलत आहेत. दरम्यान, फ्रान्सने (France) एक मोठा निर्णय घेत ब्रिटनहून येणाऱ्या सर्व लोकांना क्वारंटाइन राहणे बंधनकारक असल्याचा आदेश जारी केला आहे. भारतात आढळलेल्या कोरोना विषाणूचे प्रकार थांबविण्याच्या दिशेने फ्रान्सने हे पाऊल उचलले आहे.
अधिकृत प्रवक्ते गॅब्रियन एटेल यांनी बुधवारी सांगितले की, फ्रान्सने उचललेले हे पाऊल जर्मनीसारखेच आहे, जे की ब्रिटनहून येणाऱ्या लोकांसाठी घेतले गेले आहे. अशा परिस्थितीत ब्रिटनहून फ्रान्समध्ये येणाऱ्या सर्व लोकांना अपरिहार्यपणे क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. तथापि, हा क्वारंटाइन साठी ठेवलेला नियम किती काळ लागू होईल, हे अधिकृत प्रवक्त्यांनी सांगितले नाही. मात्र या संदर्भातील माहिती लवकरच शेअर केली जाईल असे त्यांचे म्हणणे आहे.
त्याचबरोबर ऑस्ट्रियानेही कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आणि त्याचा प्रसार पाहता ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. तेथील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, केवळ ऑस्ट्रियाचे नागरिक किंवा ऑस्ट्रियन रहिवास्यांनाच त्यांच्या देशात ब्रिटनहून येण्याची परवानगी देण्यात येईल. 1 जूनपासून ऑस्ट्रियाला जाण्यासाठी यूकेची सर्व उड्डाणे थांबविण्यात येणार आहेत.
ब्राझील, भारत आणि दक्षिण आफ्रिका नंतर आता ऑस्ट्रियाने ब्रिटनला अशा देशांच्या लिस्ट मध्ये ठेवले आहे जिथे कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन सापडला आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा