कोरोना आणि होळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात ‘करोना’ व्हायरसने थैमान घातलं असताना महाराष्ट्रात पसरलेल्या भीताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत निवेदन केलं. ‘राज्यात चिंतेचं वातावरण नाही, मात्र, काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक त्या उपाययोजना केल्याचं आहेत. पण नागरिकांनीही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. गरज नसताना गर्दी करू नका आणि धुळवडही मर्यादेत खेळा,’ असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं.

होळी हा आनंदाचा सण आहे. त्यात अमंगल सर्व जाळून टाकण्याची प्रथा आहे. करोनाचं संकटही यंदाच्या होळीत जळून खाक होईल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. ‘यापूर्वी स्वाइन फ्लूच्या संकटाच्या वेळी दहीहंडी उत्सवावर मर्यादा आल्या होत्या. अनेक मंडळांनी स्वयंस्फूर्तीनं दहीहंडी उत्सव रद्द केले होते. यावेळी हे भान राखलं जाईल. नागरिकांनी तसं ते राखावं, असं आवाहनही उद्धव यांनी केलं.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment