पायाच्या टाचांच्या भेगांसाठी करा घरगुती उपाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा मुलामुलींना पायाच्या टाचा दुखण्याचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे सहजरित्या चालत येत नाही . त्यामुळे अनेक वेळा त्रास सहन करावं लागतो. हिवाळ्याच्या आणि थंडीच्या दिवसात सुद्धा अनेक पायाच्या समस्या निर्माण होतात. सर्वात जास्त त्रास हा हिवाळ्यात निर्माण होतो त्यामुळे पायाच्या टाचांची जास्त काळजी घ्यावी लागते.

टाचेच्या भेगा भरून काढण्यासाठी थोडे काही प्रमाणात कोमट पाणी घ्या . त्यात एक चमचा मीठ आणि दोन चमचे ग्लिसरीन आणि थोडा लिमबाचा रस टाका. हे पाणी एका टॅब मध्ये घेऊन १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवा. त्याने टाचेच्या मृत त्वचा नष्ट होतात. त्यानंतर ते हलक्या हाताने घासा हे आठवड्यतून दोन ते तीन वेळा केल्यास त्वचा मुलायम होते. तसेच रात्री झोपण्यापूर्वी आधी पायाला बदामाचे तेल लावल्यास पाय मऊ होतो. त्यासाठी खोबरेल तेल सुद्धा औषधी आहे. आठवड्यातून एकदा खोबरेल तेल लावले तर तुमच्या पायाला भेगा कधी सुद्धा पडणार नाही.

पायाच्या भेगांसाठी हळद सुद्धा रामबाण उपाय आहे. हळदीमध्ये अँटी बॅक्टरील गुण असतात. या गुणधर्मामुळे लवकर भेगा भरून निघण्यास मदत होते. दररोज झोपताना पाय आणि त्याच्या टाचा स्वच्छ धुवून कोरडे करा. त्यानंतर त्यावर वितळलेले मेण लावा मेणामुळे पायाला पडलेल्या खोल भेगा भरून निघण्यास मदत होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.