पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची बाधा; ७२ जण क्वारंटाइन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । दिल्लीतील एका कंपनीत पिझ्झा डिलिव्हरीचं काम करणाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या पिझ्झा डिलिव्हरी बॉयचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनानं त्याच्या संपर्कात आलेल्या दक्षिण दिल्लीतील ७२ जणांना क्वारंटाइनमध्ये हलवलं आहे. यात हाऊज खास आणि मालवीय नगरमधील पिझ्झा मागवणाऱ्या नागरिकांचा समावेश असून, त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याचं दक्षिण दिल्लीचे जिल्हान्याय दंडाधिकारी बी. एम. मिश्रा यांनी ही माहिती दिली.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दिल्लीतील एका पिझ्झा कंपनीत डिलिव्हरी बॉयच काम करणाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं मागील आठवड्यात निष्पन्न झालं. हा डिलिव्हरी बॉय मागील आठवड्यात डायलिसीस करण्यासाठी रुग्णालयात गेला होता. त्यावेळी तो कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्याचा संशय आहे. हा डिलिव्हरी बॉय मागील आठवड्यापर्यंत पिझ्झा डिलिव्हरीचंही काम करत होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

त्याचबरोबर या डिलिव्हरी बॉयनं ज्या घरांमध्ये पिझ्झा डिलिव्हरी केली. दक्षिण दिल्लीतील ७२ जणांना जिल्हा प्रशासनानं तातडीनं क्वारंटाइन केलं. त्यांची चाचणी करण्यात आली असून, ती निगेटिव्ह आली आहे. मात्र, काही कालावधीनंतरही यांची लक्षणं दिसण्याची शक्यता असल्यानं त्यांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. ७ दिवसानंतर पुन्हा त्यांची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली. दरम्यान, दिल्लीतील स्थितीही कोरोनामुळे गंभीर बनत चालली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडूनसह दिल्लीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून अत्यावश्यक पावलं उचलली जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २९३२ वर, दिवसभरात २३२ नव्या रुग्णांची नोंद

SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद

काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का

लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन

आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा

Leave a Comment