हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इस्लामिक स्टेट (इसिस) दहशतवादी संघटनेच्या इराकमधील एका व्यक्तीविरोधात मानवी तस्करी, लैंगिक छळ आणि याझीदी मुलींचा खून यासाठी जर्मनीतील न्यायालयात खटला सुरू केला आहे. या व्यक्तीची पत्नीवर देखील म्यूनिच न्यायालयात याझीदी मुलीच्या हत्येसाठी खटला सुरु आहे. या दोघांवर तस्करीसाठी आणलेल्या एका ५ वर्षाच्या मुलीला पिण्यासाठी पाणी न दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
अल जजीराच्या म्हणण्यानुसार या इराकी व्यक्तीचे नाव अल-जे (बदललेले) असे असून त्याचे वय २७ वर्षे आहे.त्यांच्यावर फ्रॅंकफर्टच्या कोर्टात माणुसकीविरोधातील गुन्हा, युद्ध गुन्हा, मानवी तस्करी आणि खून यासारखे गंभीर आरोप लावले गेले आहेत. २०१५मध्ये, अल जे आणि त्याच्या जर्मन पत्नीने अनेक दिवसांपासून केवळ एक याझीदी मुलीवर नुसतेच अत्याचार केले नाही तर तिला पिण्यास पाणीही दिले नाही, ज्यामुळे त्या ५ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यावेळी हे दोघे इराकच्या फळुझा शहरात राहात होते. याझीदी एथनिक ग्रुपवर झालेल्या गुन्ह्यांविरूद्ध हे प्रकरण जगातील पहिले प्रकरण आहे.मृत मुलगी रानियाची आई नोरा हिने आपल्या मुलीला मारलेल्या या दोघांविरूद्ध कोर्टात साक्ष दिली आहे.
आरोपी इस्लामिक स्टेटशी संबंधित होता
जर्मन न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की अल जे २०१३ साली इसिसमध्ये सामील झाला आणि तो पकडला जाईपर्यंत या दहशतवादी संघटनेत त्याने अनेक पदे भूषविली आहेत. सिरियाच्या रक्का शहरात इस्लामिक स्टेटचा अल जे काम पाहत होता, त्यापूर्वी त्याने इराक आणि तुर्कीमध्येही या दहशतवादी संघटनेसाठी अनेक कामे केलेली आहेत.
नोराने कोर्टाला सांगितले की अल जे आणि त्याची पत्नी याझीदी मुलींना इस्लामिक स्टेटमध्ये घेऊन जात असत जेथे त्यांना लैंगिक गुलाम म्हणून ठेवले जाते. नोरालाही या दोघांनी ओलिस ठेवले होते आणि तिच्याबरोबर एक ५ वर्षांची मुलगीही होती. या दोघांनी केवळ मारहाणच केली नाही तर अनेक वेळा नोरावरही बलात्कार करण्यात आला.२०१५ च्या उन्हाळ्यात अल जीच्या पत्नीने कशावर तरी रागावून त्या ५ वर्षाच्या मुलीला साखळीच्या सहाय्याने खिडकीला बांधले आणि मागूनही न ही अन्न आणि पाणी न दिल्याने तिचा मृत्यू झाला.
सद्दाम हुसेन नंतर इस्लामिक स्टेटनेही अत्याचार केले
२०१४ मध्ये इराक आणि सीरियामध्ये इसिसची दहशत वाढत असताना तेथील रहिवाशांवर याझीदी लोकांचा छळ करण्यात आला. एकीकडे दहशतवादी वेदनादायक मार्गाने याझीदी माणसांना ठार मारायचे. त्याच वेळी, महिलांचे अपहरण केले जायचे आणि लैंगिक गुलाम म्हणून ठेवले जायचे आणि विविध प्रकारे छळ केले जायचे.
याझीदी हा उत्तर इराकमध्ये राहणारा एक समाज आहे जो कुर्दीश भाषा बोलतो. ऑगस्ट २०१४ मध्ये इसिसने उत्तर इराकमधील याझीदी भागात शिंगलेवर हल्ला केला. यानंतर ४,००,००० पेक्षा जास्त लोकांना डोहुक, इरबिल आणि कुर्दिस्तान भागात पलायन करावे लागले. यावेळी मोठ्या प्रमाणात मुली आणि महिलांवर बलात्कारही करण्यात आले. मृत्यूच्या भीतीने हजारो याझीदी महिला सिंजारच्या डोंगरावर स्थायिक झाल्या, परंतु ३००० हून अधिक याझीदी मुलींना लैंगिक गुलाम बनवण्यासाठी दहशतवाद्यांनी पळवून नेले.
बर्याच मुलींनी गोष्ट सांगितली आहे
आयएसआयएसची लैंगिक गुलाम असलेल्या लैला तालोने सन २०१८ मध्ये सांगितले की – आयएसआयएसने वेगवेगळ्या देशांमध्ये ९ वेळा मला विकले आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. लैलासारख्या अनेक यझीदी स्त्रियांची इंटरनेटवर खरेदी आणि विक्री होते.ती म्हणाली “पहिले आमच्या विषयीची माहिती इंटरनेटवर अपलोड केली जाते, त्यानंतर कोणीही आपल्या आवडीच्या मुलीला तुलनेत खूपच कमी किंमतीत आम्हाला खरेदी करतात.”
लैलाने सांगितले की २ वर्ष,८ महिने आणि ९ दिवसांच्या कालावधीत तिला लैंगिक गुलाम बनविले गेले आणि सुमारे ९ वेळा वेगवेगळ्या देशांमध्ये तिला विकले गेले. यात इराक, बगदाद आणि सौदी अरेबियाचा समावेश आहे.ती म्हणाली की तिच्यासारख्या अनेक स्त्रिया मोठ्या संख्येने आहेत ज्यांचे आयुष्य इसिसच्या तावडीत सापडले आहे आणि ते एक नरक आहे. २०१६ साली इसिसच्या ताब्यात असलेल्या इराकमध्ये दहशतवाद्यांनी १९ याझीदी -कुर्दिश महिलांना पिंजऱ्यात पेटवून जिवंत जाळले होते. या महिलांनी लैंगिक गुलाम होण्यास नकार दिला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.